न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२४) :- बिजलीनगरमध्ये हनुमान मित्र मंडळ आणि एम.एस.ई.बी. बिजलीनगरच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम व हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे. बुधवार (दि. १७) ते मंगळवार (दि. २५) दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आणि रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात दररोज सकाळी ९ ते १२ वाजता कथाकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कुलकर्णी हे कथावाचन करणार आहेत. सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रमात हरिपाठ, आरती आणि रात्री ७.०० ते ९.०० किर्तनसेवा होणार आहे.
या सप्ताहामध्ये नामवंत किर्तनकार, गुणीजन भक्तमंडळी उपस्थित राहणार आहेत. भाविक भक्तांनी व अबाल वृध्दांनी या अविट ज्ञानामृत श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने भुषण पाटील आणि किशोर चोभे यांनी केले आहे.