न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२४) :- नवरदेवाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लग्न सोहळ्यात शोककळा पसरली. सुरज राजेंद्र रायकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
तो (दि. १६) पहाटेपासून घरातून बेपत्ता होता. त्यानंतर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास विहिरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. “मला लग्न करायचं नाही. मी आत्महत्या करत आहे” असा मॅसेज त्याने आत्महत्यपूर्वी मामाला केला होता. अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास तळेगाव पोलीस करत आहेत.