- पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात हळहळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२४) :- दुचाकीवरून घराकडे निघालेल्या पोलिस हवालदार सचिन नरुटे (वय ३८, रा. वाकड) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर रावेत येथे घडली.
अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. सचिन नरुटे देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकात कार्यरत असताना त्यांनी सतत्याने उत्तम कामागिरी करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
ते स्वभावाने अत्यंत शांत, नम्र व मनमिळावू होते त्यांच्या अकाली जाण्याने पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. नरुटे यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुली आहेत.