न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२४) :- संत तुकाराम विद्यालय, देहूच्या भाग शाळा सुदुंबरे येथील १९९७-९८ बॅचच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी शाळेला तीन कपाटे भेट दिली. हे सर्व विद्यार्थी २५ वर्षांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते.
सुदुंबरे येथील जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक जिजाराम शिंदे, संत तुकाराम विद्यालय, देहूचे प्राचार्य बालाजी पुजारी, भागशाळेचे पर्यवेक्षक संभाजी नवले, राजेंद्र काकडे, हरिभाऊ खेत्रे, नंदाराम मदने आदी यावेळी उपस्थित होते.
नामदेव गाडे, बापूसाहेब दरेकर, पांडुरंग गाडे, भाऊसाहेब कराळे, भिमाजी पानमंद, शरद मोईकर, जगन शिंदे यांच्या हस्ते गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी सचिन गाडे, विनायक गाडे, सोमनाथ तरस, वर्षा गाडे, उज्ज्वला कोतवाल यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल कराळे यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा गाडे यांनी आभार मानले.