न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२४) :- सध्या पिंपरी चिंचवड शहरात मान्सूनपूर्व वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे बऱ्याचदा वादळी परिस्थिती तयार होते. अशावेळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याचा धोका संभावतो. त्यामुळे जिवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी कोणीही आपली वाहने झाडाखाली लावू नयेत. तसेच या वातावरणात कोणीही झाडाखाली थांबू नये. जेणेकरुन कोणाचेही नुकसान होणार नाही.
झाडांविषयी काही तक्रार उद्भवल्यास कृपया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उद्यान व वृक्षसंवर्धन विभागातील आपल्या क्षेत्रिय कार्यालयातील सुपरवायझरशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच अग्नीशमन विभागातील प्रभागनिहाय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा














