न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२४) :- सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या डक्टजवळ फिर्यादीच्या भावासह चौघे प्लास्टर काम करीत होत. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या भावासोबत हात उसणे घेतलेल्या १००० रुपयांच्या कारणावरुन वाद घातला. रागाने त्याची कॉलर पकडुन ‘मादरचोद मेरा पैसा अभी के अभी दो नही तो मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’ असे म्हणत त्याला शिवीगाळी केली. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जोरजोरात धक्के देत त्याला पाठीमागील लिफ्टच्या अंदाजे ४० फुट खोल डक्टमध्ये ढकलुन देवुन त्याचा खून केला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २१) रोजी दुपारी ३:३० च्या दरम्यान श्री. साई फॉर्च्यून, रॉयल ग्रुप बांधकाम साईट, लेबर कॅम्प, शिवाजीवाडी, मोशी येथे घडला. फिर्यादी गजानंद किरिसिंग कर्ष यांनी आरोपी सुरेद्रकुमार व्यासनारायण कर्ष (वय ३२ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २०५/२०२४ भा.दं.वि कलम ३०२,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. सपोनि पठारे पुढील तपास करीत आहेत.