न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२४) :- मुंबई-पुणे हायवेला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या हायवे रोडच्या सर्व्हिस रोड लगत फिर्यादी व त्यांचे दोन मित्र हॉटेल शिवराज, रावेतमध्ये जेवण करत होते. ते आपसात गप्पा गोष्टी करत हसत असताना त्यांच्या शेजारील टेबलवर बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी ‘तु आमच्याकडे बघुन का हसत आहे? आज तुला जिवंत सोडनार नाही’ असे म्हणुन त्याच्या जवळचा कोयता फिर्यादी यांच्या डोक्यामध्ये, हातावर, गालावर व छातीच्या बाजुला मारून त्यांना गंभीर जखमी केले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
मोहीत दुनटून सिंग (वय २३ वर्षे) यांनी आरोपी अनोळखी दोन इसम आरोपी निष्पन्न १) तुषार वैजनाथ सोनवणे (वय २३ वर्षे), २) वैभव उल्हास शिंदे (वय २६) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलिसांनी २०३/२०२४ भा.दं.वि कलम ३०७,५०४, ५०६,३४ सह भारतीय हत्यार कायदाकलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. सपोनि कुंभार पुढील तपास करीत आहेत.