न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२४) :- व्होक्स वॅसन व्हेन्टो ही गाडी ‘ओएलएक्स’वर विक्रीसाठी फिर्यादी यांनी जाहीरात टाकली. ती जाहीरात पाहुन ड्रिम्स कारचे एजंट यांनी फिर्यादीशी संपर्क केला. फिर्यादीची गाडी विक्री करण्याचे अमिष दाखवुन गाडीची किंमत ४,२०,००० रुपये ठरवत त्या गाडीच्या मोबादल्यात १०,००० रुपये ऑनलाईन पाठवले. उर्वरित ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे ४,१०,००० रुपये फिर्यादीस परत दिले नाहीत. तसेच रकमेपोटी फिर्यादीस सहीमध्ये बदल असलेला चेक दिला. तो चेक न वटता बँकेतून परत आला. अशा प्रकारे त्यांनी फिर्यादीची गाडी किंवा उर्वरित रक्कम फिर्यादीस परत न देता त्यांची गाडी त्यांच्या आर्थिक फायदयासाठी वापरून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत म्हंटल आहे.
हा प्रकार (दि ०१/१२/२०२३ पासुन ते दि. २२/०४/२०२४) ड्रीम्स कार शोरुम, बडोदा बँकेजवळ, काळेवाडी फाटा येथे घडला. फिर्यादी गजानन रुस्तुमराव ढोरे यांनी आरोपी १) अजित कुलाळ, २) शुभम पाटील, ३) संदिप काकडे, ४) रविंद्र राठोड, ५) प्रज्ञा नावाची मुलगी तसेच त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ५०५/२०२४ भा.द.वि. कलम ४०९,४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि गायकवाड तपास करीत आहेत.