न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- भारतीय योग संस्थानच्या काळेवाडी विभागाच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर काळेवाडी येथील जोतिबा उद्यान (पवनानगर) येथे ०१ मे ते ०५ मे या कालावधीत सकाळी ६ ते ७:३० या वेळेत होणार असून, सर्वांसाठी निःशुल्क आहे.
‘तणाव एवं अवसाद रोग निवारण’ (STRESS AND DEPRESSION PREVENTION CAMP) या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात १० वर्षांपुढील मुला-मुलींसह प्रौढ व जेष्ठ नागरिक सहभागी होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी श्रीमती तंकमनी करता, सुजाता मोरे, सुषमा कदम, आभा राणी, श्री किशोर जोशी, सुरेश पाटील, दिनकर शेखर व शशिकांत नखाते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










