न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२४) :- दोन वर्षाकरीता तडीपार केलेला नितीन उर्फ काळ रामदास कराळे (वय २८ वर्षे, रा. शेलपिंपळगाव ता. खेड जि. पुणे) हा कोणतीही कायदेशीर पुर्व परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग करुन आला.
त्याने हातामध्ये एक लोखंडी तलवार घेत बेकायदेशीररित्या हवेमध्ये फिरवली. ‘मी शेलपिंपळगाव मधील भाई आहे’, असे म्हणुन लोकवस्तीमध्ये दहशत निर्माण केली. सामान्य नागरीकांना दुकाणे बंद करून दैनंदीन व्यवहार करण्यापासुन परावृत्त करीत असताना पोलिसांना मिळुन आला. गुन्हे शाखा, युनिट ३ ने कारवाई करीत त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात २४६/२०२४ म.पो. कायदा कलम १४२ भा.ह.का. कलम ४,२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेडमेड अॅक्ट कलम ७ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा झनकर पुढील तपास करीत आहेत.