न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २८ एप्रिल २०१९) :- मावळ लोकसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २२ व २७ मधील मतदान केंद्रावर सर्व जेष्ठ नागरिक मतदार बंधू भगिनी, अंध, अपंग, वयोवृद्ध मतदारांना आपले हक्काचे मतदान करता यावे, यासाठी मोफत रिक्षा सेवा पुरविण्यात येणार आहे.
काळेवाडी तापकीरनगर परिसरातील काका इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कडक उन्हाळा आहे. तापमान सारखे वाढतच आहे.
त्यामुळे पुण्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी कमी झाली. मतदारांनी मतदानापासून वंचित राहू नये. तसेच अंध, अपंग, वयोवृद्ध मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काका इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने उद्योजक नवीन तापकीर यांनी दिली.











