न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २८ एप्रिल २०१९) :- मावळ लोकसभा मतदार संघात आज पून्हा पैसे वाटप करीत असताना उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांना पनवेलमधील गोकूळधाम परिसरात पकडले आहे.
प्रताप रामचंद्र आरेकर (वय ५९, रा. सुकापूर) यांना भरारी पथकाचे महेंद्र गगलानी यांनी मतदारांना पैसे वाटप करताना पकडले आहे. त्यांनी त्यांच्या विरोधात नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महेंद्र गगलानी भरारी पथकासह नेरे गावच्या परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी सुकापुर येथील गोकुळधाम सोसायटी परिसरात एकजण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पैसे वाटप करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. भरारी पथकाने पैसे वाटप करणा-या प्रताप आरेकर याची झडती घेतली. त्याच्याकडे मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांची स्लीप आढळून आली आहे. तसेच, २०० रुपयांची २९ पाकिटेही प्रताप आरेकरकडून जप्त करण्यात आली आहेत. याबाबत निवडणूक आयोगाचे कर्मचारी पथक अधिक चौकशी करत आहे.











