न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०१९) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शिरूर व मावळ मतदारसंघ येतात. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी ( दि .२९) रोजी होणार आहे. प्रशासकीय कामासोबत पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात ४ हजार ३३१ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस महासंचालकांनी २ पोलीस उपायुक्त, ६ सहायक पोलीस आयुक्त, २० पोलीस निरीक्षक, ५० पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ५७५ पोलीस कर्मचारी असा एकूण १ हजार ६५३ पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा निवडणुकीच्या काळात शहरासाठी दिला आहे. उर्वरित पोलीस बंदोबस्त पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे.


















