न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २८ एप्रिल २०१९) :- मनोरुग्ण असणाऱ्या चाळीस वर्षीय मुलाने ६० वर्षीय आईचा घरातील कात्रीने वार करुन खून केल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली.
सुमन सावंत (वय ६०, आठवण हॉटेल पाठीमागे गुरुद्वारा रोड, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. तर मुलगा भुपेंद्र (४०) हा मनोरुग्ण आहे. हा प्रकार रविवारी सकाळी राहते घरात झालेला असून, दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला आहे.
भूपेंद्र हा मनोरुग्ण असून, आई व वडिलांसोबत वाल्हेकरवाडी येथे राहतो. पाच महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याच्यावर येरवडा येथे मनोरुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्याला घरी आणले. त्याच्या लग्नासाठी आणि अन्य कारणांमुळे सुमन आणि भुपेंद्र यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. याआधीही सुमन यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता.
चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. पोलीस शोध घेत आहेत.


















