न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. २ हजार ५०४ मतदान केंद्रावर तब्बल २२ लाख २७ हजार ७२३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आज रविवार (दि. २८) रोजी सांगवीतील पीडब्लूडी मैदानातून शहरातील विविध मतदान केंद्रांवर मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना करण्यात आली. भर उन्हात मतदान केंद्र व साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी घाई करीत होते.
या साहित्यांमध्ये प्रामुख्याने सीयुब, बीयुब, व्हीव्हीपॅट मशीन्स देण्यात येत होत्या. एका मतदान केंद्रावर एक केंद्र अध्यक्ष, एक फस्ट पोलिंग ऑफिसर, २ पीओ, १ शिपाई व एक पोलिस असा लवाजमा ठीक साडेबारा वाजता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी सूचना देताच, साहित्य घेऊन बसमध्ये बसला व आप-आपल्या मतदान केंद्राकडे रवाना झाला.


















