न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०१९) :- पनवेलमधील देवेदमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्याविरोधात नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक भरारी पथकाच्या फिर्यादीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
देवेदमध्ये संजय पाटील असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या नावाच्या २३ मतदारांच्या चिठ्ठ्या सापडल्या आहेत.
त्याच्याकडे २ हजार रुपयांच्या ३ नोटा, ५०० रुपयाच्या २२ नोटा २०० रुपयाच्या ५ नोटा १०० रुपयाच्या २१ नोटा तसेच ”रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडळ पनवेल – भाजप सरकार कामगिरी”, असे लिहिलेली वही सापडली आहे. मतदारांना पैशांचे आमिष दाखविले या कारणाखाली खांदेश्वर पोलिसांनी कलम १७१ (इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











