न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मे २०२४) :- डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने अक्षयतृतीयेनिमित्त शुक्रवार (दि. 10) मे रोजी रूद्र याग, चंदन उटी व भंडारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी 7 ला श्रींची महापुजा व अभिषेक, 9 वाजता श्रींची चंदन उटी, 11 वाजता रूद्रयाग, (होमहवन), दुपारी 4 ते सहा हरिपाठ व श्री डोळसनाथ महिला भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम, सहा वाजता कालभैरवाष्टक, जप, नामस्मरण, सायंकाळी 6.15 वाजता ह.भ.प. तुषार महाराज दळवी, भाजे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम, सात वाजता दीपमाल प्रज्वलन, व रात्री 8 वाजता महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांनी हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
ज्या भाविक भक्तांना भंडाऱ्यासाठी देणगी द्यावयाची आहे त्यांनी ट्रस्टच्या सभासदांशी संपर्क साधावा. हा सर्व कार्यक्रम लोकसहभागातून होणार असल्याने जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन सत्कर्म करून पुण्य तिथीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे सभासद राजेश सरोदे, यतीन सुरेशभाई शहा, अजय भेगडे, हेमंत दाभाडे यांनी केले आहे.