न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मे २०२४) :- काळेवाडीतील बालाजी लॉन्स येथे सोमवारी (दि. ६) रात्री पावणे नऊच्या सुमारास लग्न मंडपात इलेक्ट्रिक कनेक्शनवर लावलेल्या फटाक्यांमुळे डेकोरेटेड स्टेजला आग लागली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे.
मुख्य अग्निशमन केंद्र, रहाटणी, थेरगाव उप अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डेकोरेटेड स्टेजला लागलेली आग उपस्थित नागरिकांच्या सहाय्याने विझवली. जखमीला नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.