न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २९ एप्रिल २०१९) :- सध्याची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेली असून, त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी आई वडिलांना या धावपळीच्या युगात वेळच नाही. त्यामुळे अनेक तरुण आपल्या कर्तव्या पासून भरकटलेली आहे.आई वडिलांचे सेवा व देश सेवा यापासून ही तरुणाई फार लांब असल्याचे भयावर चित्र सध्या समाजात आहे. त्यामुळे तरुणांमध्ये देशभक्ती जागृत करण्याची गरज असल्याचे पदमश्री अँड उज्वल निकम यांनी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ” बदलत्या युगाचा बादलता युवा “याविषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी पदमश्री अँड उज्वल निकम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी उद्योजक शंकर जगताप, यशदा ग्रुपचे वसंत काटे, पी. के. स्कूल चे संस्थापक जगन्नाथ काटे,पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, उन्नती सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उन्नति सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, आनंद हास्य योगा क्लब, नवचैतन्य हास्य क्लब, अजिंक्य भिसे स्पोर्ट्स क्लब खेळाडू तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील सर्व सोसायटीचे सभासद व नागरिक उपस्थित होते.
यानिमित्ताने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा उन्नति सोशल फौंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये समाज प्रबोधनकर शारदा मुंडे यांना, दिव्यांग मुलांसाठी कार्य करणारी तारा सोफेश धडफळे सेन्टर यांना आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार, वाल्मिक कुटे व योगेश मालखरे यांना सेवा रत्न पुरस्कार, किशोर नखाते यांना मल्लविद्या रत्न पुरस्कार, अनिल पिंपळीकर व ज्ञानेश्वर जगताप यांना क्रीडा रत्न पुरस्कार, उमेश धूत यांना अभिनय रत्न पुरस्कार, हर्षवर्धन यादव यांना क्रीडा रत्न, सागर काटे यांना बलसेवा रत्न पुरस्कार, शिवप्रसाद डांगे यांना शब्दरत्न पुरस्कार, हेमा खंडागळे यांना युवा रत्न पुरस्कार पदमश्री अँड उज्वल निकम यांच्या हस्ते देण्यात आले.
सद्याची तरुणाई वेगळ्या वळणावर जात असल्याने तरुणाईला योग्य दिशा दाखवणे ही काळाची गरज आहे. आजचा तरुणच देशाचा कणा आहे, तर आजच्या तरुणाच्या हातात देशाचे उद्याचे भवितव्य आहे, असे मनोगत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.















