- तर, नामांकित बँकांनाही कोटीची टोपी; तब्बल चौदा जणांच्या टोळीला पोलिसांनी हेरले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- १ कोटीच्या गुंतवणूकीच्या बदल्यात १ महिन्याला १.७५ करोड रुपये मिळणार असल्याचे आमिश दाखवून तरुणाला ९० लाख रुपये देण्यास भाग पाडले. फक्त ५०,००० रु. रक्कम देवून उर्वरीत ८९,५०,००० रु. रक्कम स्वतःच्या फायदयाकरीता वापरुन फिर्यादीची फसवणूक केली.
तसेच आरोपी क्रं १२,१३ व १४ यांनी संगणमत करुन, पुर्वनियोजित कट रचून अशिक्षित व अल्पशिक्षीत व्यक्तींना ते उच्च शिक्षीत असल्याचे दाखवून लिस्टेड कंपनीमध्ये नोकरीस असल्याचे बनावट कागदपत्रे तयार केली. त्यांचे नावे खोटया सॅलरी स्लीप बनविल्या. सॅलरी स्लीपच्या आधारावर अँक्सीस बँक येथे रु. १६,९७,००० रक्कमेचे लोन आणि आयसीआयसीआय बँक, हिंजवडी शाखा येथे एकूण ३ होम लोनद्वारे एकत्रित ८०,७२,५०२ रुपये रक्क्म मंजूर करवून घेतली. तसेच होम लोन मंजूर करतेवेळी बाजारभावापेक्षा जास्त मूल्यांकन किंमत (ओव्हर वॅल्युऐशन) रक्कम सॅक्शन करवून घेतली व लोन अकाउंट बुडित करून बँकांची देखिल फसवणूक केली आहे.
हा प्रकार सप्टेंबर २०२३ ते आजपर्यंत हॉटेल ला-बाली, बावधन आणि हॉटेल पिंगारा, बावधन पुणे येथे तसेच दुय्यम निबंधक कार्यालय मावळ २, तळेगाव दाभाडे येथे घडला. याप्रकरणी अजिंक्य जगदिश पाटील (रा. सेनापती बापट रोड, पुणे) यांनी आरोपी १) वासुदत्त भारत डुबे, वय ३४ वर्ष अंदाजे, रा- बावधन पुणे, २) चंद्रकांत मोरे, वय २८ वर्ष अंदाजे, रा खुर्द फुलंब्री संभाजीनगर, ३) प्रकाश बळीराम थोरात, वय ४० वर्ष अंदाजे रा- बल्लूर दुर्ग बल्लूर परभणी, ४) सी ए सागर कोकाटे पत्ता-शॉप क्र १२६, १ माळा, लोढा बोलेवार्ड मॉल, माजिवाडा, ठाणे, ५) सी ए नितीन चंद्राणी, वय ३५ वर्ष, फलॅट क्र डी/७०५ सनफलॉवर सोसायटी, सर्वे क्र २६/२ कोंढवा, ६) वसीम जिलानी शेख, वय ३५ वर्ष, रा फलॅट क्रमांक बी/२०१ साई पॅराडाईज सेक्टर ४, किंग्ज ईलेक्ट्रॉनिक्स समोर, नेरुळ, ७) अँड विष्णुदास चंडेल, वय ३२ वर्ष, रा-पोस्ट मालेवाडी, परभणी, ८) अनिल क्षत्रिय हयुमन रिसोर्स हेड, टेक्सास कंपनी, ऑफिस क्र ए/६१७ लोढा सुप्रमस २, वागळे ईस्टेट, ठाणे, ९) मधुसुदन टेक्सास कंपनी, रा, सदर १०) उत्तम शेळके वय ३५ वर्ष, बँक प्रतिनीधी, रा न-हे पुणे, ११) कृतीका पोलावर वय ३२ वर्ष अंदाजे, रा. कॉलेज शेजारी, बावधन पुणे, १२) विनोद आण्णा शिंदे, वय २५ वर्ष, रा-पिंपरी राजा, संभाजीनगर, १३) दिपक सखाराम जंगम वय २९ वर्ष, रा-फलॅट क्र १०१ ब्लुबेरी होम्स, वाघोली पुणे, १४) विजय साहेबराव शिंदे, रा पिंपरी राजा संभाजीनगर यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ७०१/२०२४, भा.दं. वि. कलम ४०६,४१९,४२०,४६५,४६७,४६८,४७१,१२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी क्रं १, २,३,११ व १२ अटक आहे. के. डी. सपकळ, पोलीस उप निरीक्षक तपास करीत आहेत.