न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- एम.एस.सी.बी ऑफीस ते सी.आय.आर.टी. मध्ये म.न.पा जॉगींग ट्रॅक, नाशिक फाटा. भोसरी येथे (दि. १७/०५/२०२४ ते दि.३१/०५/२०२४) दरम्यान वृक्ष प्राधिकरण समीतीची कोणतीही परवानगी न घेता पॅन्ट्राफारम झाड, सुबाभळ दोन, ऑस्ट्रेलीयन सुबाभळ एक, करंज दोन, स्पॅथोडिया एक, कॅसीया एक, कॅसीया वाळलेले दोन वृक्ष मुळासह तोडून, फांदया तोडून, खोडाला इजा पोहोचवून, वाळलेले वृक्ष तोडून एकूण ३,००,००० रुपयाचे दंडात्मक चलनानुसार नुकसान केले आहे.
याप्रकरणी सुरेश गोविंद घोडे (उदयान सहाय्यक) यांनी आरोपी १) कुमार गेरा, २) विजय कल्याणकर ३) बालाजी खांडेकर (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही). गेरा इम्मिरीयल गेट वे गेरा डेव्हलपमेंट प्रा. लि. यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ३५६/२०२४, महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमन) अधिनियम १९६४ चे कलम ३ (१), ४ महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ (१) अन्वये नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गुरव तपास करीत आहेत.


















