न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- ‘लिव इन रिलेशनशिप’मध्ये राहणारा आरोपी घरात राशन व घर खर्च देत नव्हता. म्हणुन फिर्यादी त्यास त्याबाबत वारंवार विचारत असत. फिर्यादीने राशन व घर खर्चासाठी घरी बोलावले असता आरोपीने त्याच्यासोबत आणलेल्या बॅगमधील एक प्लास्टीकची बाटली बाहेर काढुन ‘आज तुझा विषयच संपवुन टाकतो’ असे म्हणत त्यातील पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर टाकले.
घरातील माचीस शोधुन ते पेटवुन फिर्यादीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीला घरात ओढुन नेऊन तेथे शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली आहे, असं फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.०२) रोजी दुपारी ३. ४० वा चे सुमारास कोकणे चौक, रहाटणीत घडला. ३० वर्षीय महिलेने आरोपी आदम खान मलंग खान पठाण (वय २९ वर्षे रा. काळेवाडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी वाकड पोलिसांनी ६८१/२०२४ भा.दं.वि कलम ३०७,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अटक आहे. सपोनि गायकवाड पुढील तपास करीत आहेत.