न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०१९) :- महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार यंदा चिंचवड येथिल वसंत ग्रूप ऑफ़ इंडस्ट्रीजचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर अरुण मित्तल यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्य संपन्न झाला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अरुण मित्तल यांनी मिळालेला पुरस्कार आई-वडील, पत्नी व बंधू यांना अर्पण केला.
या सोहळयास टाटा मोटर्सचे माजी महाव्यवस्थापक मनोहर पाराळकर, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, आयोजक पुरुषोत्तम सदाफुले, रंगनाथ गोडगे आदी उपस्थित होते. वसंत ग्रूप हा गेली ४० वर्षापासून पिंपरी चिंचवड, चाकण शहरात कार्यरत आहे.











