न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०१९) :- काळेवाडी तापकीरनगर येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबिटी इंग्लिश मेडियम स्कूल यांच्या संयुक्त विदयमाने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भाषणे व पोवाडे सादर केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर (मा. विरोधी पक्षनेते पिं. चिं. मनपा) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक सतिश घरत होते. यावेळी माजी नगरसेविका अनिताताई तापकीर, संस्थेचे सचिव सागर तापकीर, युवा नेते सोमनाथ तापकीर, संस्थेचे संचालक राजू पवार, सामाजिक कार्यकर्ते शेळके मामा, मुख्याध्यापक शशिकांत वाखारे सर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन बापू बल्लाळ सर यांनी तर, देव सर यांनी आभार मानले.











