न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२४) :- लोकनेते स्वर्गीय गोपिनाथराव मुंडे यांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त (दि. ०३) रोजी मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) आणि मित्रपरिवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) चे खजिनदार दत्तात्रय धोंडगे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ह्युमन राईटस चे सदस्य अण्णा जोगदंड, प्रबोधनकार शारदाताई मुंडे, दत्तात्रय धोंडगे, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक/अध्यक्ष अरुण पवार, शिवकुमारसिंह बायस, अमोल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते नितीन चिलवंत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळेस संघाचे अध्यक्ष / संचालक अरुण पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले, स्वाभिमान व संघर्ष हे साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक वैशिठ्य होते. मुंडे साहेबांच्या जाण्याने आपला महाराष्ट्र पोरका झाला, गोपीनाथराव मुंडे हे सर्व जनतेचे आधारस्तंभ होते आणि खऱ्या अर्थाने ते एक जानता नेता होते म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणून ओळख मिळाली होती, असे म्हणून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मराठवाड्याच्या मातीतील सळसळत्या रक्तामध्ये ज्या लोकनेत्याचा जन्म झाला ते म्हणजे गोपीनाथजी मुंडे. दुधात साखर विरघळावी असा स्वभाव साहेबांचा होता. महाराष्ट्राला दिशा देण्यात प्रगतशील करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर कामे केलेली आहेत. मुंडे साहेबांनी तन,मन,धन हे संपूर्णपणे अर्पण करून त्यांनी देशाची सेवा केली. मुंडे साहेब हे गोपीनाथ नावाप्रमाणेच अनाथांचे नाथ होते. संपूर्ण आयुष्य संघर्षमय होत गरीबांचा कैवारी म्हणजे गोपीनाथजी साहेब आज तुम्ही हवे होतात.
समाजप्रबोधनकार शारदाताई मुंढे यांनी मराठवाडा भुमीपुत्र यांच्या जीवनावर आधारित येणारी संकटे,कष्ट यांना त्यांच्या मार्मिक भाषे मध्ये विचार मांडले. मुंडे साहेब आणि त्यांचे घराणे या बाबत सर्व उपस्थितांना माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते नितीन चिलवंत हे कार्यक्रम प्रसंगी बोलताना म्हणाले नाथाचा नाथ जो तोच गोपीनाथ ह्यांच्या जीवनपटातून जनतेच्या भूमिपुत्राला त्यांच्या आदर्श घालून दिला. सामान्य कार्यकर्त्यापासून मंत्री पदापर्यंत केलेली कार्य उल्लेखनीय आहेत .कोणी किती वर्ष जगला त्या पेक्षा कसा जगला याला महत्व आहे. राजकरणाच्या पलीकडचे गोपीनाथजी मुंडे साहेब आहेत, असे ते म्हणाले.
अमोल लोंढे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.












