- लोकशाहीर आण्णा भाऊ साठे व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांना शिवशाही व्यापारीसंघाचे अभिवादन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०१९) :- १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शिवशाही व्यापारीसंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पुर्णाकृती पुतळ्यास व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांना शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, भरत इंगळे, आशिष वाळके, रविकिरण घटकार आदी उपस्थित होते.
प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्यासोबतच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनीही आपल्या शाहीरीतुन अखंड महाराष्ट्र राखण्यासाठी सक्रीय सहभाग घेतला होता. साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांनी मातंग समाजात जन्म घेतल्यामुळे, त्यांच्या कार्याचा पाहीजे असा सन्मान राखला जात नाही, ही खुप मोठी शोकांतीका आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रदिनी अखंड बारा-बलुतेदार समाजबांधवांचे नेतृत्व करणारे आण्णाभाऊ साठे यांचे मुंबई विद्यापीठाला नाव देऊन, त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री फडणवीस व पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे केली आहे.











