न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०१९) :- १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ध्वजारोहण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिकेच्या आवारात आज सकाळी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका शर्मिला बाबर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, जनसंपर्क विभागाचे अण्णा बोदडे, प्रभाग सदस्य संदीप गाडे व मनपा अधिकारी, कर्मचारी व आदी उपस्थित होते











