न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०१९) :- एका तरुणाने तरुणीची कॉलर पकडत अश्लील शिवीगाळ केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे. गंभीर बाब म्हणजे तरुणाच्या आईने देखील मुलाला साथ देत तरुणीला आणि तिच्या बहिणीला शिवीगाळ केली आहे. तसेच दोघींना पाहून घेतो म्हणून धमकी दिली आहे.
या प्रकरणी स्वरुपा लोढा आणि आरोपी मुलगा दर्शन लोढावर गुन्हा दाखल करण्यात आला. २३ वर्षीय तरुणीने चिंचवड पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत असून आरोपी आई आणि मुलाला अटक करण्यात आलेली आहे.











