न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२४) :- ओम गगनगिरी वर्ड फाउंडेशनच्या वतीने आंदर मावळातील दुर्गम भागातील माळेगाव ब्रू आणि तडपेवाडी या गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यात नोटबुक्स, पेन, पेंशील, खोडरबर, बॅग, लिहिण्याचे पॅड, रेनकोट, छत्री या शैक्षणिक साहित्यांचा समावेश होता. माळेगाव ब्रू (मावळ) या शाळेचे शिक्षक मनीष टोके यांनी आभार मानले.
फाउंडेशनच्या संस्थापिका, अध्यक्षा डॉ. रेखा भोळे यांना मोरेश्वर भोंडवे, नामदेव ढाके, मनोज पाटील, राकेश वायकोळे, प्रवीण नारखेडे यांनी मदत केली. किरण चौधरी, ओम भोळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे यांनी सहकार्य केले.