न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे.
याबाबतचे आदेश राज्य शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज बुधवारी काढले आहेत. सहायक आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे महत्वाच्या आरोग्य विभागाची जबाबदारी होती.