न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२४) :- ७ वर्षांचा मुलगा खेळत असलेला बॉल सोसायटीच्या गेट समोरील रोडवरुन घेवुन आतमध्ये येत होता. त्यावेळी चारचाकी गाडीवरील चालक आरोपीने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून चालवली.
फिर्यादीच्या मुलाच्या उजव्या पायाच्या पंजावर गाडी घालुन गंभीर दुखापत केली. वैदयकीय सेवा न पुरविता निघुन गेला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. ०९) रोजी सायं ०५.३० वा.चे सुमा ओझोन निलय सोसायटी, नविन डीमार्ट जवळ, तळेगाव दाभाडे येथे घडला.
अनिल शिवाजी जाधव (वय ३३ वर्ष) यांनी आरोपी संदीप विठ्ठलराव देवकर (रा.आय.आर.बी प्लॉट मंगरुळ, ता. मावळ, जि.पुणे) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी ३३८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ब) सह मो.वा.का.क १३४(अ) ११९/१७७,१८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोउपनि मुल्ला पुढील तपास करीत आहेत.











