न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२४) :- तिघेजण मोठमोठ्याने आरडा ओरड करुन गाडयांच्या काचा फोडत होते. यावर का तोडफोड करीत आहात? असे फिर्यादीने त्यांना विचारले. त्यावर आरोपी क्र ३ याने फिर्यादीची गचांडी पकडत म्हणाला, ” तु मला ओळखत नाहीस का, मला करण पटेकर म्हणतात.” त्यानंतर ‘याला पकडा रे’ असे म्हणाला, आरोपी क्र १ व २ यांनी फिर्यादीस पकडुन आरोपी क्र ३ याने फिर्यादीच्या बरमुडयाच्या उजव्या खिशात हात घालुन जबरदस्तीने खिशातील रोख रक्कम ६५० रुपये काढुन घेतली.
दरम्यान तुम्ही माझे पैसे जबरदस्तीने घेतले आहेत. परंतु माझ्या या औरा गाडीला दगड मारुन माझ्या औरा कारचे नुकसान करु नका असे म्हणताच आरोपी क्र ३ याने फिर्यादीच्या गाडीच्या पाठीमागील काचेवर सिमेंटचा गट्टू फेकून मारुन गाडीची पाठीमागील काच फोडली. तसेच आरोपी क्र २ याने तोच सिमेंटचा गड्ड घेवून हातात धरुन गाडीच्या पुढच्या काचेवर मारला. तसेच त्याच गट्टूने त्यांनी इतर गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १०) रोजी रात्री ००.४५ वा. साई सलून समोर गणेश कॉलनी, ज्योतीबानगर, पीसीएमसी शाळेजवळ, काळेवाडी गावठाण, काळेवाडी येथे घडला. सतिश रामकेवल यादव (वय ३० वर्षे, धंदा व्यवसाय) यांनी आरोपी १) अंशु जॉर्ज किपलिंगकर (वय अंदाजे २३ वर्षे रा. काळेवाडी), २) आर्यन रमन पवार (वय १९ वर्षे), ३) करण रवी पटेकर (वय २५ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ७९७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५), ३२४ (४)/(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पोटे पुढील तपास करीत आहेत.











