- नववीत शिकणाऱ्या मुलाची सातव्या मजल्यावरून उडी आत्महत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२४) :- पिंपळे सौदागरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रोझ लँड सोसायटीच्या एक्स विंगच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन अवघ्या १४ वर्षाच्या मल्हार मकरंद जोशी या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अद्याप आत्महत्येच कारण समजू शकलं नाही. शेवटचा कॉल हा त्याच्या आईला मल्हार ने केला होता. त्यांनतर त्याने अस टोकाचं पाऊल उचलले आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी अवघ्या चौदाव्या वर्षी मल्हार ने आयुष्य संपवण्याचा निर्णय का? घेतला याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
इयत्ता नववी मध्ये शिकत असलेला मल्हार आणि त्याचा भाऊ हे दोघेच घरी होते. तर आई- वडील हे बीड जिल्ह्यातील परळी येथे बाहेरगावी गेले होते. आज दुपारी बाराच्या सुमारास मल्हार आई ला फोन लावण्यासाठी आई च्या मैत्रिणीकडे गेला होता. आई शी फोनवरून बोलणं देखील झालं. त्याच वेळेत मल्हार ने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. नेमकं मल्हार च त्याच्या आईशी काय बोलणं झालं? याचा तपास सांगवी पोलीस घेत आहेत.


















