न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२४) :- भंगार गोळा करण्याच्या कारणावरून तरुणाला दोघांनी शिवीगाळ, दमदाटी केली. कटरसारख्या हत्याराने तरुणाच्या गळयावर वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार (दि.१२) रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास भाजी मंडई जवळील ब्रीजखाली, नजीर चिकन सेंटर समोर, पिंपरी येथे घडला. फिर्यादी महेश आंबादास करनाके (वय ३८ वर्ष, धंदा-मजुरी) यांनी आरोपी १) रवि सुर्यवंशी (वय-३५ वर्ष, रा. पिंपरी), २) राजु लालबहादुर प्रसाद (वय ३१ रा. पिंपरी भाजी मंडई) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ६४१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५२, ३५१ (२) (३), ३(५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी क्रं २ याला अटक केली आहे. संदिप देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.














