न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२४) :- भाजपचे अमित गोरखे यांची विधान परिषदेवर आमदारपदी निवड झाली आहे. भाजपाने ही निवड करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे. मातंग समाजाच्या इतिहासातील विधान परिषदेवर जाणारे ते पहिले युवा आमदार ठरले आहेत.
त्यानिमित्त आज रविवार (दि. १४) दुपारी ३.०० वाजता भक्ती शक्ती, निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकापासून विजयी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमित गोरखे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.














