न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी प्रभाग कार्यालयांतून (दि. २ व ३ मे) या तारखेला अर्ज वाटप करण्यात आले आहे. आज शनिवार (दि. ४) तारखेला सकाळी ११ ते २ या वेळेत अर्ज वाटप होणार आहे. तर दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज स्विकृती होईल.
प्रत्येक प्रभाग समितीसाठी प्रत्येकी ४ याप्रमाणे पक्षनेता कार्यालयातून एकूण ३२ अर्ज नेण्यात आले. येत्या ९ तारखेला महापालिकेतील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात सकाळी ११.३० पासून प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी निवडणुकीला सुरुवात होईल. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची विभागीय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
भाजपतर्फे आज शनिवारी (दि. ४) रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज स्विकृतीच्या वेळी प्रत्येक प्रभाग समितीसाठी एका उमेदवाराचा सकाळी अर्ज भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ९ तारखेला निवडणुकीच्या दिवशी निवडीची फक्त औपचारिकताच शिल्लक राहणार आहे.
शिवसेना किंवा अपक्ष आघाडीला एखाद्या प्रभाग समितीचे अध्यक्षपद देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
– एकनाथ पवार – सत्तारूढ पक्षनेते











