- मेसेजमधील लिंक, वेबसाईट, फाईलला क्लिक करु नका; सावध रहा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२४) :- युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेचा लोगो व नावाचा वापर करुन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकव्दारे नागरीकांना त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट करण्याबाबत मेसेज आले आहेत.
त्यामध्ये Union Bank Addhar Update61.apk ही फाईल जोडण्यात आलेली आहे. त्याव्दारे Torzon virus नागरीकांच्या मोबाईल फोनमध्ये पाठवुन नागरीकांच्या वैयक्तीक माहितीचा गैरवापर होऊन मोठे नुकसान होऊ शकते.
अनोळखी मोबाईल क्रमांकव्दारे आलेला मेसेज मधील लींक, वेबसाईट, फाईल यांना क्लिक करु नये. सावध रहा, सर्तक रहा, जागरीरुक रहा, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, सायबर सेल यांच्याकडुन नागरीकांना करण्यात आले आहे.