न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२४) :- चौघांनी फर्मकडुन लॅन केबल हा माल विकत घेतला. तथापी मालाची थकबाकी किंमत रुपये ४७,८८,७९२ रु. न देता चौघांनी संगणमताने फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे.
दरम्यान फिर्यादी व फिर्यादीची पत्नी हे दुकानात मालाची थकबाकी मागण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या पत्नीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तुम्हाला कोठे जायचे तिकडे जा, थकबाकी मिळणार नाही व देणारपण नाही, मी जर जुना सतपाल बनलो तर पुढे तुम्हाला कठीण जाईल अशी धमकी दिली, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १६/०४/२०२४) रोजी आर.आर. वायर्स अॅन्ड केबल्स दुकान, टेल्को रोड, चिंचवड येथे घडला. फिर्यादी सचिन चंद्रकांत शिंदे यांनी आरोपी १) रोहित सतपाल मित्तल, २) महिला आरोपी ३) महिला आरोपी ४) राहुल सतपाल मित्तल ५) सतपाल मित्तल (रा. निगडी प्राधिकरण) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ६५७/२०२४, भादवि कलम ४२०, ४०६, ३५४ (अ), ५०६, ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि शेटे तपास करीत आहेत.