न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२४) :- कंपनीची बस टाटा मोटर्स, चिखली येथे जात होती. दुपारी ०२.१५ वाजता ही बस क्रांती चौक, नवी सांगवी येथुन उजवीकडे वळत असताना वाहतूक कोंडी झाली. दरम्यान बजाज के.टी.एम. दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी मुलांपैकी निळ्या रंगाचा फुल टि-शर्ट घातलेल्या मुलाने बस चालकाला ‘तुमच्या बसमुळे ट्राफिक जाम झाले’ असे म्हणुन शिवीगाळ केली.
त्यावेळी फिर्यादी व बसमधील इतर कर्मचारी ट्राफिक काढण्यासाठी खाली उतरले. त्यावेळी त्या मुलाने रस्त्यावरील दगड उचलुन तो बसमधील कर्मचारी सचिन घाटगे यांच्या डोक्यात मारला. त्याच्या जवळील कात्री फिर्यादी यांच्या कपाळावर, छातीला, डाव्या हाताच्या पोटरीला मारून त्यांना जखमी केले. त्यांनतर ते दोघे जण त्यांच्या दुचाकीवरुन त्या ठिकाणाहुन निघुन गेले, असं फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी नितिन बबन गायकवाड यांनी आरोपी बजाज के.टी.एम. दुचाकी क्रं एम.एच.१२-एल.वाय.-५५९८ वरील दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी ३०१/२०२४ बी.एन.एस. कलम ११५ (२),११८(१),३५२,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि वाघुले पुढील तपास करीत आहेत.


















