न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०१९) :- थेरगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला गप्पा मारत थांबलेल्या दोन जणांवर शनिवारी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
आठ-नऊ जणांच्या अज्ञात शसस्त्र टोळक्याने गप्पा मारत उभा असलेल्या मित्रांवर हॉकी स्टिक ने बेदम मारहाण करत कोयत्याने वार केले आहेत. यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, इंद्रजित आणि अजय अशी त्यांची नावे आहेत.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी अजय तुकाराम खानेकर या जखमी तरुणाने फिर्याद दिली असून, अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.











