न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२४) :- बोपखेलच्या वृंदावन सोसायटीतील कॉलनी नं २, गणेश नगर येथे (दि ३१/०७/२०२४) रोजी दुपारी ४ वाजता लहान मुलं खेळत असताना लोखंडी गेट अंगावर पडून साडेतीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता.
सोसायटीला लोखंडी गेट बसविताना गेटला स्टॉपर लावण्यास हयगय करुन योग्य ती उपाययोजना न करता निष्काळजीपणा केल्याने ही घटना घडली. गिरिजा गणेश शिंदे या चिमुकलीचा त्यात मृत्यू झाला होता.
या प्रकरणी मुलीचे वडील गणेश लक्ष्मण शिंदे (वय ३१ वर्ष रा. जिजामाता कॉलनी, गणेशनगर बोपखेल) यांनी १) महिला आरोपी, २) श्रानिवासलु संधीरेडडी (वय ३० वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी ३३२/२०२४भारतीय न्याय सहिंता कलम १०६ (१), ३(५) प्रमाणे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि कटपाळे तपास करीत आहेत.














