न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२४) :- म्हाळुंगेतील हॉटेल इमेज फॅमिली रेस्टॉरंट येथे गिर्हाईकाने त्याच्याकडील गन काढली. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील फॅमिली ए.सी. रूममध्ये पुर्वेकडील भिंतीवर फायर केले. स्वतःचा व हॉटेलमधील इतर ग्राहकांचा व हॉटेल स्टाफचा जिव जावु शकतो याची जाणिव असतानाही त्याने गनमधुन गोळ्या फायर केल्या आहेत.
हा प्रकार (दि ३) रोजी पहाटे ०१.०० वा. सुमारास घडला. फिर्यादी दत्ता तानाजी अर्जुन यांनी आरोपी बाळासाहेब व्यकटराव दराडे (वय ४१ वर्षे, सुसगाव ता. मुळशी जि. पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ९०७/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा ११०,१२५ आर्म ऑक्ट कलम ३० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत आहे. पोउपनि शेळके तपास करीत आहेत.


















