न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. याबाबत पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे यांनी आदेश दिले.
चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ आणि तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश बांगर यांना संलग्न करण्यात आले. या बादल्यांमागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.
काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांचा दप्तरी (रायटर) अमोल जाधव याला अटक केली. या कारवाईला जबाबदार धरून ढमाळ यांची बदली केल्याचे बोलले जात आहे. तसेच, चिंचवड आणि तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर झालेल्या कारवाईमुळे अंकुश बांगर आणि जितेंद्र कोळी यांना संलग्न केल्याची सूत्रांची माहिती आहे.














