- सलग दुसऱ्यांदा पटकावलं कांस्यपदक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२४) :- भारताने कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनचा २-१ अशा फरकाने पराभव करत १४ वं ऑलिम्पिक पदक हॉकी संघाने पटकावलं आहे. या विजयासह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे.
संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकले आहे. याआधी त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकले होते. भारतीय हॉकी संघाच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा भारताने सलग दोनदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. यापूर्वी १९६८ आणि १९७२ च्या ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा कांस्यपदकासाठी भारत वि स्पेन यांच्यात हॉकी सामना खेळवला गेला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. पण कोणताच संघ गोल करू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनला पेनल्टी मिळाली आणि त्यांनी गोल करत आघाडी मिळवली. यानंतर ३०व्या मिनिटाला भारताला पेनल्टी मिळाली आणि यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. पण स्पेन गोल करण्यात अपयशी ठरला. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताकडून हरमनप्रीतने पेनल्टीवर गोल केला. यासह भारताने २-१ अशी आघाडी मिळवली. चौथ्या क्वार्टरमध्ये स्पेनला दोन पेनल्टी मिळाले.