- जवळपास सात कोटींचा दंड वसुली; आपच्या मागणीला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरात गेरा या बांधकाम व्यावसायिकाने विनापरवाना रस्ते खोदाई केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून 6 कोटी 94, 08 हजार 800 रूपये दंड आकारून वसूल करण्यात आला आहे.
विनापरवाना वॄक्षतोड केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. जॉगिंग ट्रॅकची तोडफोड केली होती. त्याचा देखिल दंड त्या बांधकाम व्यावसयिकास लावण्यात आला होता.
गेरा बांधकाम व्यावसायिकाचे पिंपरी चिंचवड शहरात चालू असणाऱ्या सर्व बांधकामांची चौकशी करून शहानिशा करावी. विनापरवाना विद्युत केबल टाकली आहे का? विनापरवाना वृक्ष तोड केली आहे का? या सर्व मागण्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना केल्या होत्या. त्यातील एक मागणी पुर्ण करण्यात आली आहे, असे आपचे रविराज काळे यांनी सांगितले.














