न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२४) :- शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित, कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर, काळेवाडी या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. सरकारच्या “हर घर तिरंगा” मोहिमेमुळे या सर्वात मोठ्या राष्ट्रीय सणाच्या भव्यतेत भर पडली आहे. यावर्षी स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत संस्थेचे सचिव, मल्हारीशेठ तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सकाळी ८:३० वाजता कोंडीबा गोविंद गादेवार सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, पुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजाराम तापकीर, सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, चंद्रकांत तापकीर, संतोष पिराजी वरे ॲरगनायजिंग सेक्रेटरी पिं.चिं. केमिस्ट असोसिएशन, रविंद्र बारकू पवार अध्यक्ष पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन, उद्योजक नारायण घाडगे. उद्योजक बापू देखमुख, दंतरोग तज्ञ राजू कुंभार, प्रियल कुंभार,परविंदर सिंग बाध, स्वप्निल जंगम, प्रशांत कदम,ऋषिकेश जुंदरे, अमित कोठावदे, गणेश पवार, सचिन दोरगे, केतन थोरात, तेजस साळवी,म्हळाप्पा दुधभाते, सुहास सुर्यवंशी, संदीप सुर्यवंशी, पुणे जिल्हा केमिस्ट असोशिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विवेक तापकीर आदी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी लेझीम, झेंडा, घुंगुरकाठी, डम्बेल्स व रिंग सारख्या विविध प्रकारच्या कवायती सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर पिरामिड, अम्ब्रेला व पॉम पॉम ड्रील, अशा प्रकारचे नृत्य व कसरती सादर केले. अथर्व पाटील, सार्थक हांडे, वैष्णवी दहिभाते,वेदांत राठोड भक्ती सोंळुके या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री पवार यांच्या अधिपत्याखाली, इतर शिक्षक/शिक्षकेतर यांनी केले. प्रियांका जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर उल्का जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.