न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२४) :- जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यांनी निगडी येथील भक्ती शक्ती शिल्प तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
निगडी येथील देशातील पहिले महिला रिक्षा स्टॅन्ड मधून अजित पवार यांनी रिक्षाने निगडीपर्यंत प्रवास केला. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे, घर काम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळेसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.











