न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२४) :- ०९ ऑगस्ट क्रांती दिन आणि १५ ऑगस्टचे औचित्य साधून चिंचवडमध्ये आम आदमी पार्टी तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आम आदमी पार्टीचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या पुढाकराने यावेळी ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य संग्रमातील महान सेनानींना अभिवादनही करण्यात आले.
आकुर्डी येथील आम आदमी पार्टी येथे आपचे राज्य प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, कामगार प्रतिनिधी अनिल पाटील, शहाराध्यक्ष मीना जावळे, प्रकाश परदेशी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर चिंचवड येथील हुतात्मा चाफेकर बंधू यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिरंगा यात्रेची सुरूवात करण्यात आली. या यात्रेदरम्यान विठ्ठल रूक्मिणी मंदिर, मोरया गोसावी मंदिर येथे जाऊन उपस्थितीत मान्यवरांनी दर्शन घेतले. तर हुतात्मा चाफेकर वाडा येथे अभिवादन करून या यात्रेचा शेवट करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष अजित फटाके, पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, उद्योग आघाडी प्रदेश सचिव संतोष इंगळे, शहराध्यक्ष मीना जावळे, शहर उपाध्यक्ष राजाराम चाकणे, प्रचार प्रमुख अय्याज सय्यद, महासचिव स्वप्निल जेवळे, मीडिया प्रमुख यशवंत कांबळे, उपाध्यक्ष ब्रह्मानंद जाधव, सहसचिव सचिन पवार, आरटीआय आघाडी प्रमुख यल्लापा वालदोर, भारती जाधव, पुनम गिते, स्वप्निल म्हसके, कल्याणी चाकणे, अभिजीत सूर्यवंशी, रवीराज काळे, अजय सिंह, चंद्रमणी जावळे, गिरीश नेटके, सुरेश भिसे, केतन चाभरे, तसेच इतर आप कार्यकर्ते व जागृती पालक युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.











