न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२४) :- अॅम्ब्युलन्सवरील चालकाने त्याच्या ताब्यातील अॅम्ब्युलन्स हयगयीने चालविली. फिर्यादीच्या राहत्या घराच्या गेट जवळील सिमेंट कॉलमला बाहेरील बाजुने धडक दिली. मार्बलचे नुकसान करून स्वतःसह अॅम्ब्युलन्सचे नुकसान करण्यास कारणीभुत झालेला आहे. अपघाताच्या वेळी अॅम्ब्युलन्स चालक हा दारू पिलेला होता असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १७) विष्णुप्रिया बिल्डींग, जीवन ज्योती हॉस्पीटल जवळ, महाराष्ट्र कॉलनी, रहाटणी येथे घडला. फिर्यादी रवि वासुदेव शर्मा (वय ३५ वर्षे, रहाटणी) यांनी आरोपी अॅम्ब्युलन्स नंबर एम.एच.१४/सी.डब्य.०८५० यावरील चालक (नाव पत्ता नाही) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ९०५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५, ३२४ (४) मो.वा. कायदा कलम १८४, १८५, ११९/१७७,१३२(१) (क) प्रमाणे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शंतनु नाईक निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक तपास करीत आहेत.














