न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२४) :- सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४५ वा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रविवारी (दि. १८) रोजी भोसरी येथील स्व. अंकुशराव लांडगे सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला.
मंडळातील सभासद कुटुंबातील ५ ते ७० वर्षे वयोगटातील सुमारे ८० कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या सुमारे २५० गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा कोकण भूषण पुरस्कार कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादव यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी आ. महेश लांडगे, कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष कैलास कदम, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, स्थाई समितीचे मा. चेअरमन संतोष लोंढे, कामगार नेते सचिन लांडगे, मा. नगरसेविका सुजाता पालांडे, मा. नगरसेवक शितल शिंदे, मंडळाचे संस्थापक प्रमोद राणे, मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, अंकुशराव साईल, भाई प्रभु, मालिनी घारे, समीर कालमित्रा, चंद्रकांत गायकवाड, उपाध्यक्ष अरुण दळवी, खजिनदार धर्मराज सावंत, सह खजिनदार चंद्रकांत साळस्कर, सह सेक्रेटरी प्रकाश साईल, कार्याध्यक्ष विश्वास राणे, संदीप सावंत, सुरेश गवस, संतोष सुतार, विलास गवस, सुनील साळुंखे आदी उपस्थित होते.











